काहीही केलं तरी सीबील स्कोअर वाढत नाहीये? मग फक्त 'या' तीन गोष्टी करा!
कर्ज घेण्यासाठी तुम्ही बँकेकडे गेलात तर अगोदर तुमचा सिबील स्कोअर (CIBIL Score) तपासला जातो. सीबीलची स्थिती पाहूनच तुम्हाला लोन द्यायचे की नाही हे ठरवले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसीबील स्कोअर चांगला नसेल तर काय करावे, हा स्कोअर वाढावा यासाठी काय करता येईल? असे विचारले जाते. याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या....
CIBIL स्कोअर ही एका प्रकारची रेटिंग सिस्टिम आहे. याच्याचच मदतीने बँका तुम्हाला लोन द्यायचे की नाही हे ठरवतात. हा स्कोअर पाहूनच तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता की नाही, हे बँक ठरवते. CIBIL स्कोअर हा 300 ते 900 या अंकांच्या मध्ये असतो.
ज्या व्यक्तीचा CIBIL स्कोअर हा 750 पेक्षा अधिक असतो, त्यांची आर्थिक स्थिती चांगली असूने ते कर्ज फेडू शकतात, असे समजले जाते. बँका साधारण 79 टक्के कर्ज CIBIL स्कोअर पाहूनच मंजूर करतात.
CIBIL स्कोअर वाढण्यासाठी काय करायला हवे, असे अनेकजण विचारतात. जर तुमचा CIBIL स्कोअर हा 750 पेक्षा कमी झालेला असेल तर खालील तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. यातील सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे अधिक क्रेडिट कार्ड्स असतील तर फक्त एक कार्ड चालू ठेवून इतर कार्ड्स बंद करून टाकावेत.
तसेच क्रेडिट कार्डमधील एकूण बॅलेन्सच्या 30 टक्के हिस्साच मंथली बेसीसवर खर्च केला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे क्रेडिट कार्डचे बील वेळेवर भरावे. ड्यू डेटच्या अगोदरच बील भरावे.
तुम्ही या तीन गोष्टींची काळजी घेतली तर पुढच्या तीन महिन्यांत तुमचा सीबील स्कोअर वाढू शकतो. कधीकधी सीबील स्कोअर वाढण्यासाठी सहा महिन्यांचाही कालावधी लागू शकतो.