Yogasana For Platelets : नैसर्गिकरित्या प्लेटलेट्स वाढवायचे असतील तर रोज करा ही योगासने.
शरीरात प्लेटलेट्सची संख्या योग्य असणं खूप गरजेचं आहे. शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्यास, रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास रक्तस्त्राव, यकृत, फुफ्फुसाचा संसर्ग अशा समस्या सुरू होतात. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्लेटलेट्स आपल्या शरीरातील अस्थिमज्जापासून तयार झालेल्या रक्तपेशी आहेत, ज्या रक्तात गुठळ्या होतात आणि रक्त वाहण्यापासून प्रतिबंधित करतात. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे.(Photo Credit : pexels )
प्लेटलेट्स वाढविण्यासाठी किंवा आपल्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी आपण उपचारांचा आधार घेऊ शकता. याशिवाय तुम्ही काही योगासनांचा ही आधार घेऊ शकता. रोज ही योगासने करून प्लेटलेट्स सहज वाढवता येतात-(Photo Credit : pexels )
रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी ताडासन रोज करता येते. यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर सरळ उभे रहा आणि पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता दोन्ही हात जोडून वरच्या दिशेने जा आणि बोटे एकमेकांत अडकवून दीर्घ श्वास घ्या आणि तळहात आकाशाच्या दिशेकडे घेऊन जा. आता पायांचे गुडघे उचलून पायाच्या बोटांवर या. आता पायाच्या बोटांवर जोर देताना हात वरच्या बाजूला खेचून घ्या. काही वेळाने पुन्हा नॉर्मल पोझिशनमध्ये या.(Photo Credit : pexels )
वज्रासन करण्यासाठी प्रथम योगा मॅटवर गुडघे मागे वाकवून बसा. आता आपले नितंब टाचेवर ठेवा. दोन्ही पाय एकमेकांपासून दूर ठेवा. आता आपले डोके, मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवा आणि आपले तळवे आपल्या मांडीवर ठेवा. थोडा वेळ असेच बसा आणि नंतर नॉर्मल व्हा.(Photo Credit : pexels )
यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर उभे राहा आणि पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता दीर्घ श्वास घेताना उजवा पाय बाहेरच्या बाजूला वाकवा आणि श्वास सोडताना आपले शरीर उजवीकडे वळवा. आता डावा हात आणि उजवा हात एकत्र करून जमिनीला स्पर्श करा. दोन्ही हात सरळ रेषेत ठेवा. श्वास घेताना आधीच्या स्थितीत परत या आणि नंतर दुसर्या बाजूला हीच पुनरावृत्ती करा.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )