Health Tips : दररोज 30 मिनिटांच्या चालण्यामुळे किती कॅलरी बर्न होतील? जाणून घ्या तुमच्या वजनानुसार संपूर्ण फिटनेस प्लॅन !
आजच्या अनहेल्दी लाइफस्टाइलमध्ये फिटनेस खूप महत्वाचा आहे. यासाठी चालणे हा एक उत्तम मार्ग आहे, जो केवळ तुमचे वजन नियंत्रित करत नाही तर अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतो. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता प्रश्न असा पडतो की, दररोज २०० कॅलरीज बर्न करण्यासाठी आपण किती चालले पाहिजे? अशावेळी हे तुमचं वजन आणि चालण्याचा वेग यावर अवलंबून असतं. आता जाणून घेऊया वजन कमी करताना किती वेळ चालले पाहिजे आणि त्याद्वारे किती कॅलरीज कमी करता येतील.(Photo Credit : pexels )
वजन ५५-६५ किलोच्या दरम्यान असेल तर,मध्यम गतीने कमी होते : 15 मिनिटांत 50 कॅलरीज, 30 मिनिटांत 100 कॅलरीज,1 तासात 200 कॅलरीज. (Photo Credit : pexels
जलद गतीने होईल : १५ मिनिटांत ९५ कॅलरीज, 30 मिनिटांत 185 कॅलरीज,1 तासात 370 कॅलरीज. (Photo Credit : pexels )
वजन 65-75 किलोच्या दरम्यान असेल तर,मध्यम गतीने कमी होते : १५ मिनिटांत ६० कॅलरीज, 30 मिनिटांत 112 कॅलरीज, 1 तासात 225 कॅलरीज(Photo Credit : pexels )
जलद गतीने होईल : 15 मिनिटांत 100 कॅलरीज,30 मिनिटांत 214 कॅलरीज,1 तासात 430 कॅलरीज (Photo Credit : pexels )
गुडघ्यात किंवा हातात थोडं वजन ठेवून चाललं तर शरीराला चांगला आकार मिळतो आणि वजनही झपाट्याने कमी होतं. (Photo Credit : pexels )
सरळ मार्गाने किंवा रस्त्यावरून चालण्यापेक्षा पायऱ्या किंवा चढून चालण्याचा प्रयत्न करा. यामुळे आरोग्याला ही फायदा होतो आणि कंटाळा ही कमी होतो.(Photo Credit : pexels )
दररोज स्वतःसाठी एक नवीन लक्ष्य सेट करा आणि जेव्हा जेव्हा आपण ते साध्य कराल तेव्हा पुन्हा आपला विक्रम मोडण्याचा प्रयत्न करा.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )