Fig Water Benefits : वजन कमी करण्यापासून ते हाय बीपी कंट्रोलपर्यंत सकाळी अंजिरचे पाणी पिल्याने होतात आश्चर्यकारक फायदे !
सकाळी लवकर उठल्यानंतर आपण जे खातो-पितो त्याचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. तुम्हीही सकाळची सुरुवात चहा-पराठ्याने करत असाल तर सावध व्हा. तुमची ही सवय शरीरातील अनेक आजारांचे मूळ आहे. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज आम्ही तुम्हाला एका सुपरफूडबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पाण्यात दडलेले अनेक फायदे आहेत.आम्ही कोरड्या अंजीरबद्दल बोलत आहोत. अनेकदा लोक पाण्यात भिजवलेले अंजीर खातात, पण त्याचे पाणी फेकून देतात. तुम्हीही असे करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल . (Photo Credit : pexels )
जर तुम्हीही हाय बीपीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही सकाळी उठून भिजवलेल्या अंजीराचे पाणी पिऊ शकता. कारण यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांचा भरपूर समावेश असतो. अशावेळी तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यात ही मोठी भूमिका बजावते.(Photo Credit : pexels )
अंजीरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. अशावेळी पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते. याचे पाणी पिल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येतही आराम मिळतो.(Photo Credit : pexels )
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. अशावेळी सकाळी रिकाम्या पोटी याचे पाणी पिल्याने ही तुमची त्वचा चमकदार होते. त्याचबरोबर आपल्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.(Photo Credit : pexels )
अंजिरचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास ही मदत होते. फायबरयुक्त हे फळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याचे सेवन केल्यास वजन नियंत्रित करता येते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )