Sharad Pawar : शरद पवार डोलीतून रायगडावर, तुतारी चिन्हाचं अनावरण!
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. (Photo Credit : ABP MAJHA)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. (Photo Credit : ABP MAJHA)
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. (Photo Credit : ABP MAJHA)
चिन्ह अनावराच्या निमित्ताने शरद पवार तब्बल 40 वर्षानंतर रायगडवार गेले आहेत. (Photo Credit : ABP MAJHA)
'तुतारी' चिन्हांचं लॉन्चिंग या वेळी करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' पक्षाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण सोहळा आज रायगडावर पार पडला. (Photo Credit : ABP MAJHA)
दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
शरद पवारांना मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अॅड.सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. (Photo Credit : ABP MAJHA)
शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. (Photo Credit : ABP MAJHA)