Health Tips : वजन कमी करण्यापासून बद्धकोष्ठतेपर्यंत, रात्री लवकर खाल्ल्याने आरोग्याला होतात हे फायदे !
वयोवृद्ध असो वा डॉक्टर, प्रत्येकजण रात्री लवकर जेवण करण्याविषयी सांगत आला आहे. उशीरा खाल्ल्याने नीट पचत नाही आणि आरोग्यालाही फायदा होत नाही असं आपण अनेकदा ऐकलं असेल. असे का घडते याचा तुम्ही विचार केला आहे का? रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती असावी आणि लवकर अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्यास कसा फायदा होऊ शकतो.जाणून घेऊया . (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री वेळेवर जेवण केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. हे आपल्याला झोपण्यासाठी पुरेसा वेळ देखील देते, जेणेकरून आपण दुसऱ्या दिवशी देखील ताजेतवाने वाटू शकता.(Photo Credit : pexels )
रात्रीचे जेवण लवकर केल्याने हृदयाचे आरोग्यही सुधारते. ही एक चांगली सवय आहे जी तुमची पचनक्रिया सुधारते, जेणेकरून चरबी आणि कोलेस्टेरॉलची समस्या दिसणार नाही.(Photo Credit : pexels )
खाणे आणि झोपणे यात किमान २ तासांचे अंतर असावे. खाण्याबरोबरच झोपल्याने अन्न नीट पचत नाही, झोपही नीट लागत नाही. जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना गॅस, अॅसिडिटी आणि पोटदुखीची ही तक्रार असते. अशावेळी या गोष्टी टाळण्यासाठी रात्री लवकर जेवण करण्याचा सल्ला दिला जातो.(Photo Credit : pexels )
जर तुम्ही 10 किंवा 11 वाजेपर्यंत झोपत असाल तर कोणत्याही परिस्थितीत 8 किंवा 9 वाजेपर्यंत रात्रीचे जेवण केले पाहिजे. यानंतर तुम्ही थोडं चालू शकता, ज्यामुळे वजन कमी करणंही सोपं जातं. रात्रीचे जेवण लवकर खाल्ल्याने अन्न पचते आणि यामुळे तुमचे पोट बाहेर येण्यापासून देखील रोखू शकते.(Photo Credit : pexels )
जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही तेव्हा मधुमेहाचा धोका वाढतो. अशा वेळी झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी खाणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले शरीर अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करून इन्सुलिनचा योग्य वापर करू शकेल, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )