Zee Chitra Gaurav Award 2024 : 'शिल्पा शेट्टी' च्या लावणीने वाढली 'झी चित्र गौरव' सोहळ्याची शान!
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने पार पडला. (Photo Credit : ZEE)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप खास आहे. बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले आहे. (Photo Credit : ZEE)
यावर्षी बाईपण भारी देवा, झिम्मा २ यांसारखे महिला विशेष चित्रपट खूप गाजले. (Photo Credit : ZEE)
यावर्षीच्या झी चित्र गौरव 2024 सोहळ्याच खास आकर्षण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (Photo Credit : ZEE)
झी चित्र गौरव पुरस्कार 2024 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यांचा मराठी गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. (Photo Credit : ZEE)
पहिली अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी' जी आपल्या स्टाइलसाठी नेहमी चर्चेत असते. दुसरी 'सारा अली खान' हिने आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo Credit : ZEE)
'सारा अली खान' ने 'ऐका दाजीबा' म्हणतं उपस्थित पाहुण्याचं लक्ष वेधून घेतलं. 'आँख मारे' ह्या गाण्यावर साराने केलेल्या तडकत्या फडकत्या नृत्याने मंचावर आग लावली. (Photo Credit : ZEE)
अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी'ने लावणी सादर करून या सोहळ्याची शोभा वाढवली. (Photo Credit : ZEE)
तेव्हा गाजणार हा मराठी चित्र सोहळा,आपण आलात तर नादच खुळा ! (Photo Credit : ZEE)
16 मार्च 2024 (शनिवार ) 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२४' सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हा सोहळा झी मराठी वाहिनीवर संध्या. 7.00 वाजता पाहता येणार आहे. (Photo Credit : ZEE)