Benefits of Tomato : टोमॅटो खाण्याचे आरोग्यासाठीचे फायदे

भारतीय जेवणात टोमॅटोचा वापर अनेक प्रकारे केला जातो. कधी आपल्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी तर कधी सॅलडच्या रूपात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टोमॅटो चवीला खूप चविष्ट असतो, पण तुम्ही विचार केला आहे का की जेवणाला चविष्ट बनवण्यासोबतच टोमॅटो आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. [Photo Credit : Pexel.com]

व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी, फायबर, फोलेट आणि कॅल्शियमसारखे अनेक फायदेशीर घटक टोमॅटोमध्ये आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
टोमॅटोचे सेवन केल्यास ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन केल्याने तुम्हाला पुढीप्रमाणे फायदे मिळू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
टोमॅटोमुळे पोटाची उष्णता कमी होते - जर एखाद्या व्यक्तीला पोटात उष्णता जाणवत असेल तर त्याने रोज एक टोमॅटो रिकाम्या पोटी खावे. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. [Photo Credit : Pexel.com]
पोटातील जंत दूर करा- जर कोणाला पोटात जंत होण्याची समस्या असेल तर टोमॅटो कापून त्यात काळी मिरी मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा. रोज असे केल्याने काही दिवसातच तुमचा त्रास कमी होईल . [Photo Credit : Pexel.com]
हृदयासाठी फायदेशीर - हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये टोमॅटो खाणे फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]
दृष्टी सुधारते- दृष्टी सुधारण्यासाठी टोमॅटोचे सेवन रिकाम्या पोटी करावे. टोमॅटोमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही दररोज रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
एवढेच नाही तर टोमॅटोच्या चटणीने जेवणाची चवही वाढवता येते. कोणत्याही स्वरूपात टोमॅटोचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]