Dates Benefits :गोड पदार्थात खजूर खाणे असे ठरेल फायदेशीर !
गोडाचा स्वतःचा एक वेगळा आनंद आहे.लोकांना मिठाई खाण्याचे खूप वेड असते.अनेकदा अन्न खाल्ल्यानंतर लोकांना काहीतरी गोड खावेसे वाटते यावेळी आपण खजूर खाऊ शकता . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाहीतरी गोड खाण्याच्या नादात अनेकवेळा ते असे काही खातात जे काही वेळा त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.मात्र खजूर अशा प्रसंगी आरोग्यदायी ठरते . [Photo Credit : Pexel.com]
खजूर नैसर्गिक गोड असतात : खजूर फ्रक्टोजचा उत्कृष्ट स्रोत आहे. फ्रक्टोज हे फळांमध्ये आढळणाऱ्या साखरेचे नाव आहे. [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे खजूर खूप गोड असतात आणि खारीक अनेक प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये साखरेचा पर्याय म्हणून वापरतात. [Photo Credit : Pexel.com]
खजूर मध्ये भरपूर पोषक असतात : खजूर मध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सशिवाय अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. [Photo Credit : Pexel.com]
सुमारे 100 ग्रॅम खजूरमध्ये 75 ग्रॅम कार्ब, 7 ग्रॅम फायबर, 2 ग्रॅम प्रथिने, 15% पोटॅशियम, 13% मॅग्नेशियम, 40% तांबे, मँगनीज 13%, लोह 5% आणि व्हिटॅमिन बी-6 15% असते. [Photo Credit : Pexel.com]
खजूर मध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहून बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. यामुळे व्यक्तीचे पोट स्वच्छ राहते आणि अनेक समस्यांचा धोका कमी होतो. [Photo Credit : Pexel.com]
हृदयासाठी फायदेशीर : खजूर मध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. [Photo Credit : Pexel.com]
हृदयाव्यतिरिक्त, खजूर कर्करोग, अल्झायमर आणि मधुमेहाची वाढ रोखण्यास मदत करते. तसेच, खजूर ऊर्जा पातळी वाढविण्यात खूप मदत करतात.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]