Headaches Natural Remedies : डोकेदुखी कमी करण्यासाठी औषध- गोळ्यां ऐवजी हा उपाय करा !

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव आणि डोकेदुखी ही सामान्य गोष्ट झाली आहे.परिणामी लोक अनेकदा औषध- गोळ्यांचा अवलंब करतात. औषध- गोळ्यांचा सतत किंवा जास्त वापर केल्याने अनेक प्रकारे हानी होऊ शकते.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सर्व प्रथम खोलीचे दिवे मंद करा. मंद प्रकाश शरीर आणि मन दोन्हीला आराम देतो. यानंतर पार्श्वभूमीत काही शांत संगीत वाजवा. हे तुम्हाला आराम करण्यास मदत करतील. [Photo Credit : Pexel.com]

जेव्हा शक्य असेल तेव्हा नैसर्गिक उपायांनी डोकेदुखी बरा करण्याचा प्रयत्न करा. डोके मसाज करणे सर्वात प्रभावी आहे, यामुळे औषधांशिवाय देखील आराम मिळू शकतो. जाणून घेऊया मसाज कसा करायचा . [Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि स्नायूंना आराम मिळतो. दररोज मसाज केल्याने तणाव आणि डोकेदुखीपासून खूप आराम मिळतो. [Photo Credit : Pexel.com]
मान आणि खांद्याची मालिश:मान आणि खांद्यांना हलका गोलाकार मालिश केल्याने स्नायूंमध्ये रक्त परिसंचरण वाढते. हे स्नायूंना आराम देते आणि त्यांच्यात लवचिकता आणते. [Photo Credit : Pexel.com]
डोके मालिश : तणाव आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. याशिवाय बदाम, ऑलिव्ह आणि लॅव्हेंडरसारखे तेलही गुणकारी आहे. [Photo Credit : Pexel.com]
या तेलांमध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात जे डोकेदुखी आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. टाळूवर बोटे हलके हलवा आणि दाब लावा. यामुळे रक्ताभिसरण वाढते. [Photo Credit : Pexel.com]
या प्रकारची मसाज रोज केल्याने तणाव आणि त्यामुळे होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो. मसाज केल्याने केवळ डोकेदुखी किंवा तणावापासून आराम मिळत नाही तर केसांसाठीही ते फायदेशीर ठरेल. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]