Uses of Coconut oil : खोबरेल तेलाचे हे उपयोग देखील जाणून घ्या ...
नारळाच्या तेलात अर्थात खोबरेल तेलात भरपूर पोषक असतात. यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखोबरेल तेलाचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतील, पण आज आम्ही तुम्हाला खोबरेल तेलाच्या अशा अनेक उपयोगांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल. [Photo Credit : Pexel.com]
खोबरेल तेल सामान्यतः केसांसाठी आणि शरीराच्या मसाजसाठी वापरले जाते. [Photo Credit : Pexel.com]
नारळाचे तेल स्वयंपाकासाठीसुद्धा वापरता येते. [Photo Credit : Pexel.com]
चेहरा स्वच्छ करण्यासाठी खोबरेल तेल चेहऱ्यावर लावा आणि मॉइश्चरायझेशन ठेवा.त्वचेत मॉइश्चरायझर टिकवण्यासाठी खोबरेल तेलाने मसाज करावा. [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्हाला कॉफी पिण्याची खूप आवड असेल तर दुधाऐवजी कॉफीमध्ये एक चमचा खोबरेल तेल आणि मध टाका. रिकाम्या पोटी नारळाची कॉफी पिणे खूप फायदेशीर ठरेल. [Photo Credit : Pexel.com]
एखाद्या वस्तूवरून स्टिकर काढताना, मागे राहिलेले ठिपके आणि डाग खोबरेल तेलाने पुसून टाकता येतात. [Photo Credit : Pexel.com]
जर तुमचे केस खूप कोरडे झाले असतील तर केसांना कंडिशनर म्हणून खोबरेल तेल लावा. [Photo Credit : Pexel.com]
त्वचा कोमल ठेवण्यासाठी शेव्हिंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर खोबरेल तेल लावणे फायदेशीर ठरते. [Photo Credit : Pexel.com]
नारळाच्या तेलात मीठ आणि इतर कोणत्याही तेलाचे काही थेंब घालून तुम्ही तुमचे शरीर स्क्रब करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]