Side Effects of Cinnamon : दालचिनीचे जास्त सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम!
भारतीय स्वयंपाकघरात दालचिनीचे स्वतःचे फायदे आहेत मात्र काही तोटे देखील आहेत. दालचिनीमुळे जेवणाची चव दुप्पट होते. यासोबतच यामध्ये अनेक आरोग्य समस्या दूर करण्याची क्षमता देखील आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला माहिती आहे का की दालचिनी मुळे आरोग्यालाही मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे दालचिनीचे सेवन केल्यास त्यामुळे होणारे नुकसान समजून घ्या. [Photo Credit : Pexel.com]
दालचिनीचे दुष्परिणाम: दालचिनी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही साखर कमी करणाऱ्या कोणत्याही औषधासोबत दालचिनीचे सेवन केले तर ते योग्य ठरणार नाही. [Photo Credit : Pexel.com]
ते तुमच्या रक्तातील साखर खूप कमी करू शकते ज्यामुळे तुमच्या शरीराला थकवा जाणवू शकतो. तुमच्या समस्या अनेक पटींनी वाढू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
दालचिनीमध्ये असलेल्या सिनामल्डीहाइडमुळे घसा खवखवणे, जळजळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
दालचिनीचे जास्त प्रमाणात सेवन श्वसनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. अस्थमाच्या रुग्णांनी दालचिनी वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे कारण यामुळे खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
दालचिनी पाचन प्रक्रियेत व्यत्यय आणते. काही लोकांमध्ये, दालचिनीच्या अति वापरामुळे पोटात जळजळ होऊ शकते. हे केवळ वेदनादायक नाही तर पोटात अल्सर आणि कर्करोग देखील होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com ]
गॅस्ट्रोपेरेसिस असलेल्या रुग्णांनी दालचिनीचे सेवन मर्यादित केले पाहिजे कारण त्यांचे शरीर ते सहज पचवू शकत नाही. [Photo Credit : Pexel.com]
दालचिनीमध्ये कैमरिनचे प्रमाण जास्त असते. काही अभ्यासानुसार, शरीरात कैमरिनचे प्रमाण जास्त असल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. [Photo Credit : Pexel.com]
संशोधनात असे आढळून आले आहे की कैमरिन युक्त आहार घेतल्यास फुफ्फुस, यकृत आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. [Photo Credit : Pexel.com]
जास्त प्रमाणात दालचिनी खाल्ल्याने तोंडात अल्सर होण्याचा धोका वाढतो. जीभ किंवाहिरड्या सुजणे, जळजळ किंवा खाज येणे, तोंडात पांढरे डाग अश्या समस्या दालचिनी मुळे होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com ]