Eggs : अंडी आणि हे पदार्थ एकत्र खात असाल तर सावधान !
अंडी हे पौष्टिकतेचे पॉवरहाऊस आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडी उकळून किंवा ऑम्लेट बनवून अनेक प्रकारे खाता येतात. हे खाण्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे. [Photo Credit : Pexel.com]
परंतु काही गोष्टी अंड्यांसोबत खाऊ नयेत. अंड्यांसोबत काही गोष्टी एकत्र केल्यास शरीराला गंभीर हानी होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी अंड्यासोबत खाऊ नये... [Photo Credit : Pexel.com]
भाजलेले मांस आणि अंडी: काही लोक अंडी आणि भाजलेले मांस एकत्र खातात. यामध्ये प्रथिने आणि फॅट चांगल्या प्रमाणात आढळतात. [Photo Credit : Pexel.com]
या कारणास्तव, या संयोजनाच्या वापरामुळे आळशीपणाची समस्या उद्भवते. मांस आणि अंडी एकत्र खाल्ल्याने तुम्हाला आळशी वाटते. [Photo Credit : Pexel.com]
साखर आणि अंडी:साखरे सोबत अंडी खाणे खूप हानिकारक आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र शिजवल्याने त्यामधून अमिनो अॅसिड बाहेर पडतात, जे शरीरासाठी विषारी बनतात. त्यामुळे रक्तात गुठळी होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
सोया दूध आणि अंडी:व्यायामशाळेत जाणारे सहसा अंड्यांसह सोया दूध घेतात परंतु हे मिश्रण शरीरासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे शरीरातील प्रथिने शोषण्याची प्रक्रिया बाधित होते. [Photo Credit : Pexel.com]
चहा आणि अंडी:बरेच लोक चहा आणि अंडी एकत्र खातात, परंतु या दोन्हीच्या मिश्रणामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. ज्यामुळे आरोग्याला मोठी हानी होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
या गोष्टींसोबत अंडी खाऊ नका:याशिवाय अनेक गोष्टी अंड्यासोबत खाऊ नयेत. चुकूनही खरबुजासोबत अंडी खाऊ नयेत. बीन्स, चीज किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टीसोबत अंडी खाणे टाळावे. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]