National Dentist's Day :या जीवनसत्त्वांच्या कमतरतेसोबतच हा निष्काळजीपणा देखील तुम्हाला पायरियाचा शिकार बनवू शकतो !
दरवर्षी 6 मार्च हा दिवस राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्याचा उद्देश लोकांना दंत काळजीबद्दल जागरूक करणे हा आहे. दातांची काळजी शरीराच्या इतर भागांइतकीच महत्त्वाची आहे. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होणे, पिवळे, दुर्गंधी येणे आणि पायरिया अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आपण पायरियाबद्दल जाणून घेणार आहोत.(Photo Credit : pexels )
दात नीट साफ न केल्याने तोंडात बॅक्टेरिया वाढू लागतात आणि त्यामुळे पायरिया होऊ शकतो. तोंडातून खूप दुर्गंधी येणे, हिरड्यांमधून रक्त येणे आणि दातांची कमकुवत हालचाल ही पायरियाची लक्षणे आहेत. शिवाय, यामुळे हिरड्यांमध्ये सूज देखील येऊ शकते. तसेच दातांचा रंग पांढऱ्यावरून पिवळा होऊ लागतो.(Photo Credit : pexels )
पायरियाचे एक प्रमुख कारण म्हणजे शरीरात जीवनसत्त्व सीची कमतरता. हे जीवनसत्त्व आपली प्रतिकारशक्ती निरोगी ठेवते. ज्यामुळे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो. संत्री, लिंबू, यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये जीवनसत्त्व सी चांगल्या प्रमाणात असते. (Photo Credit : pexels )
दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनसत्त्व बी 12 खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे दात कमकुवत होऊ लागतात. नंतर, यामुळे पायरियाची समस्या देखील उद्भवू शकते. जीवनसत्त्व बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी, आहारात दूध, चरबीयुक्त मासे आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.(Photo Credit : pexels )
हाडांच्या मजबुतीसह मानसिक आरोग्यासाठीही जीवनसत्त्व डी महत्त्वाचे आहे. याशिवाय पायरियाचा धोकाही कमी होतो. या पोषक तत्वाचा उत्तम स्त्रोत म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश. दिवसातून किमान 15 ते 20 मिनिटे उन्हात बसा. दूध, दही, लोणी, चीज, कोबी, मशरूम यांचा आहारात समावेश करा.(Photo Credit : pexels )
दात मजबूत ठेवण्यासाठी आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे. शक्य असल्यास फ्लोराइड टूथपेस्ट वापरा, कारण यामुळे दात मजबूत तर होतातच, शिवाय दात किडण्याची समस्याही टळते.(Photo Credit : pexels )
दातांमध्ये अंतर असेल तर त्यात अन्नाचे तुकडे अडकलेले असतात, त्यामुळे ते असे सोडू नका, तर फ्लॉसवापरून स्वच्छ करा. बराच वेळ अन्न अडकून राहिल्याने तोंडातून दुर्गंधी येते तसेच संसर्ग होण्याची शक्यता असते.(Photo Credit : pexels )
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ही दात कमकुवत होतात. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तोंडात पुरेशी लाळ तयार होते, ज्यामुळे दात खराब करणाऱ्या जीवाणूंची संख्या कमी होते आणि तोंडातील पीएच मूल्य योग्य राहते.(Photo Credit : pexels )
फक्त थंडीच नाही तर जास्त गरम पदार्थ खाल्ले तर जाणून घ्या की दातांच्या आरोग्यासाठी ते योग्य नाही. असे केल्याने दातांचा वरचा थर खराब होऊ लागतो आणि त्यामुळे दात संवेदनशील होतात. त्याचबरोबर जास्त गरम खाल्ल्याने तोंडात आणि घशात फोड येऊ शकतात. ज्यामुळे तोंडाची साफसफाई व्यवस्थित होत नाही, त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कायम राहते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )