IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 फलंदाज!
1. विराट कोहली - आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रनमशीन विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली 237 सामन्यातील 229 डावात 7263 धावा चोपल्या आहेत. यामध्ये सात शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 643 चौकार आणि 234 षटकार ठोकले आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 113 इतकी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2. शिखर धवन आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांमध्ये शिखऱ धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर धवन यानं 216 डावात 6617 धावा केल्या आहेत. यादरम्यान दोन शतकं आणि 50 अर्धशतकं ठोकली आहे. शिखर धवनच्या नावावर 750 चौकार आणि 148 षटकारांची नोंद आहे.
3. डेविड वॉर्नर डेविड वॉर्नरनं 176 डावात 6397 धावा केल्या आहेत. वॉर्नर याने चार षटकं आणि 60 अर्धशतकं ठोकली आहेत. डेविड वॉर्नर याने 4.54 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. वॉर्नर याने आतापर्यंत 646 चौकार आणि 226 षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्मा मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मानं आयपीएलमध्ये 29.58 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 238 जावात 6211 धावा जमवल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर फक्त एका शतकाची नोंद आहे तर 42 अर्धशतकेही त्याने ठोकली आहे. रोहित शर्माने 554 चौकार आणि 257 षटकार ठोकले आहेत.
सुरेश रैना - मिस्टर आयपीएल सुरेश रैना यानं आयपीएलच्या 200 डजावात 32.52 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. रैनानं एक शतक आणि 39 अर्धशतकं ठोकली आहेत. सुरेश रैनाने 506 चौकार आणि 203 षटकार लगावले आहेत.
एबी डिव्हिलिअर्स - मिस्टर 360 अर्थात एबी डिव्हिलिअर्स यानं 170 आयपीएल डावात 39.70 च्या सरासरीने 5162 धावांचा पाऊस पाडलाय. एबीने 251 षटकार आणि 413 चौकारांचा पाऊस पाडलाय. एबीच्या नावावर 3 शतकं आणि 40 अर्धशतकं आहेत.
एमएस धोनी - कॅप्टन कूल एमएस धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 250 सामने खेळले आहेत. यामधील 218 डावात 38.79 च्या सरासरीने 5082 धावा चोपल्या आहेत. धोनीला आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही शतक ठोकता आले नाही. त्यानं 24 अर्धशतकं ठोकली आहेत. धोनीने 239 षटकार आणि 349 चौकार ठोकले आहेत.
ख्रिस गेल वेस्ट इंडिजचा विस्फोटक फंलदाज ख्रिस गेल आठव्या क्रमांकावर आहे. गेलने 141 डावात 39.72 च्या सरासरीने 4965 धावांचा पाऊस पाडलाय. ख्रिस गेल याने सहा शतके आणि 31 अर्धशतके ठोकली आहे. ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये 357 षटकार लगावले आहेत. गेलच्या बॅटमधून 405 धावांचा पाऊस पडलाय.
रॉबिन उथप्पा - रॉबिन उथप्पाने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आहेत. यामधील 197 डावात त्याने 4952 धावा काढल्या आहेत. उथप्पावा एकही शतक ठोकता आले नाही. उथप्पाने 27 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने182 षटकार आणि 481 चौकार लगावले आहेत.
10. दिनेश कार्तिक - विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने आयपीएलच्या 242 सामन्यातील 221 डावात फलंदाजी केली. यामध्ये 20 अर्धशतकं ठोकली आहेत. दिनेश कार्तिकने 139 षटकार आणि 439 चौकारांच्या मदतीने 4516 धावा केल्या आहेत.