Amla Benefits : बहुगुणी आवळा! जाणून घ्या फायदे..
चवीला तुरट आणि आंबट असणारा आवळा प्रत्येकालाच आवडतो असं नाही. मात्र, आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआवळ्याचा वापर मधुमेहाच्या रूग्णांसाठीही होतो. मधुमेहामध्ये तुम्ही आवळ्याचे थेट सेवन करू शकता, याशिवाय आवळ्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप आरोग्यदायी आहे.
आवळ्याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
डोळ्यांच्या विकारांवरही आवळा गुणकारी ठरतो.
आवळ्याचे चूर्ण चेहऱ्याला लावल्यास चेहरा उजळतो आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते.
युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी आवळ्याचे सेवन केल्याने लघवीचे प्रमाणही नियंत्रित राहते. त्याचबरोबर आवळा अपचनाच्या समस्येपासूनही आराम देतो.
सांधेदुखी होत असल्यास आवळ्याच्या रसासोबत गूळ आणि आल्याचा तुकडा खावा यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.