Peanut Butter Benefits: रोज पीनट बटर खाल्ल्याने शरीराला मिळतात 'हे' 7 फायदे; अनेक आजारांवर गुणकारी
शेंगदाण्यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात, जे हृदयरोगाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. याशिवाय यामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पीनट बटरच्या सेवनामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहाडं मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पीनट बटरचा समावेश करू शकता. पीनट बटरमध्ये लोह आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने हाडं मजबूत होतात आणि हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका देखील कमी असतो.
पीनट बटर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका देखील कमी होतो. जर तुम्ही शुगरचे रुग्ण असाल तर पीनट बटरचं सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. कारण त्यात मॅग्नेशियम आणि फायबरसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो, ज्यामुळे मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते.
पीनट बटरमध्ये भरपूर कॅलरीज, प्रोटीन आणि फायबर आढळतात, यामुळे तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं. याच्या सेवनाने भूक लवकर लागत नाही.पीनट बटर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतं.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ईचं सेवन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, पीनट बटरमध्ये व्हिटॅमिन ई आढळतं. त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही पीनट बटरचं सेवन करू शकता.
ज्या लोकांना अनेकदा अशक्तपणा आणि थकवा जाणवतो त्यांनी रोज नाश्त्यात पीनट बटरचं सेवन करावं, कारण पीनट बटर हे पोषक तत्वांचं भांडार आहे, त्यामुळे त्याचं सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.
पीनट बटरच्या सेवनाने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.