Kolhapur : कोल्हापूर पोलिसांकडून रेल्वे स्थानकावर मॉकड्रील; घाबरलेल्या प्रवाशांनी सुटकेचा सोडला नि:श्वास
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यामध्ये सापडलेल्या दहशतवाद्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वास्तव्य केल्याचे सांगितले आहे.
गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस सतर्क होऊन कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करत आहे.
याचाच एक भाग म्हणून पोलिसांकडून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मॉकड्रील घेण्यात आले.
यावेळी दहशतवादी विरोधी पथक किती वेळात घटनास्थळी पोहचते याची चाचणी घेण्यात आली.
आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी मॉक ड्रील करण्याच्या सूचना शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांना दिल्या होत्या.
रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू असून, तातडीने घटनास्थळी हजर होण्याच्या सूचना दिल्या.
पुढील 20 ते 25 मिनिटांत सर्व आपत्कालीन आणि सुरक्षा यंत्रणा सायरन वाजवत रेल्वे स्टेशनसमोर पोहोचल्या.
शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने परिसरातील गर्दी हटवून संशयास्पद वस्तूंचा शोध सुरू केला.
सुमारे 30 मिनिटांच्या शोध मोहिमेनंतर बॉम्ब शोधक पथकाला स्टेशन परिसरात दोन संशयास्पद बॅग मिळाल्या.
सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यातील बॉम्बसदृश्य वस्तू निकामी करण्याचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले.