Oral Cancer: 'अशी' असतात तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; ठरू शकतो घातक
गेल्या काही वर्षांत तोंडाचा कर्करोग झपाट्याने पसरला आहे. तंबाखू हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण म्हणता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतंबाखू, सिगारेट, गुटखा किंवा खैनी खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं आढळल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. परंतु त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष दिलं पाहिजे.
कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरपूर्वी प्री कॅन्सर स्टेज असते. कॅन्सर प्री स्टेजमध्ये असतो तेव्हा त्यावर उपचार करणं शक्य होतं.
तोंडात अल्सर असल्यास 2-3 आठवड्यांत डॉक्टरांना दाखवावं. अन्यथा तो केव्हाही कर्करोगाचे रूप घेऊ शकतो.
जीभ, जबडा किंवा तोंडाच्या आत कोणतीही जखम असेल तर ती कॅन्सरचं रूप घेऊ शकते.
याशिवाय तोंडाच्या आतील रंगातही बदल होऊ शकतो. तोंडामध्ये सफेद किंवा लाल चट्टे दिसत असल्यास हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
जर तुम्हाला तुमच्या घशात कुठेही गाठ जाणवली तर त्यावर नक्की उपचार करा. तोंडाच्या आत कोणत्याही प्रकारची जखम असल्यास दोन ते तीन आठवड्यांत नक्कीच उपचार करा. किंवा बायोप्सी करा. याद्वारे कर्करोगाचा शोध घेता येतो.
याशिवाय लाळेची तपासणी करून घ्या. कर्करोग शोधण्यासाठी बायोप्सी चाचणी सर्वोत्तम आहे.