Barvi Dam: बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफलो; ड्रोन कॅमेराने टिपली धरणाची विहंगम दृश्यं
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफ्लो झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधरण ओव्हरफ्लो झाल्याने ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
बारवी धरणाचं जलपूजन भाजप आमदार किसन कथोरे आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आलं.
जलपूजनादरम्यान धरणात फुल अर्पण करत श्रीफळ वाहण्यात आलं.
बारवी धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यानंतर ड्रोन कॅमेराने धरणाची विहंगम दृश्यं टिपण्यात आली आहेत.
आमदार किसन कथोपे यांनी बारवी धरण पंचवीस-तीस वर्षांपासून पडून राहिलं होतं असं म्हटलं. धरणाला दिशा मिळत नव्हती, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे हे धारण पूर्ण होऊ शकलं, असं मतही त्यांनी मांडलं.
बारावी धरण महत्त्वाचे धरण आहे आणि आता हे शंभर टक्के भरल्यामुळे नक्कीच या वर्षी पाण्याची टंचाई राहणार नाही, असं मत आमदार किसन कथोपे यांनी मांडलं आहे.
बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसराचे दृश्य सुंदर दिसत आहे.
बारवी धरणामुळे ठाणेकरांची तहान भागते. हे धरण मागील वर्षी 12 ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झालं होतं.