Gauri Sawant: आधी घरातून हकललं, मग वडिलांनी केले अंत्यसंस्कार... आयुष्यातील ही घाव सोसून गौरी सावंतने निर्माण केली आपली ओळख
श्री गौरी सावंत या ट्रान्सजेंडर समाजसेविका आहेत. गौरी सावंत आपल्या समाजासाठी अनेक गोष्टी करतात. त्यांच्या समाजाला देशात ओळख मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफार कमी लोकांना माहीत आहे की, श्री गौरी सावंत आज ज्या टप्प्यावर आहेत तिथे पोहोचण्यासाठी त्यांना आयुष्यात बराच संघर्ष करावा लागला. श्री गौरी सावंत यांचा जन्म महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबात झाला.
श्रीगौरींचं खरं नाव गणेश नंदन होतं. मात्र स्वत:ची समजूत काढत त्यांनी स्वत:च्या अस्तित्वाबद्दल घरच्यांना माहिती दिली. गौरीचे बोलणं ऐकून तिचे वडील मात्र चांगलेच संतापले होते.
इतकंच नाही तर गौरीच्या वडिलांनी तिला वयाच्या 15-16व्या वर्षीच घरातून हाकलून दिलं होतं आणि तिच्यावर अंतिम संस्कारही केले होते.
यानंतर गौरी सावंत हमसफर ट्रस्टमध्ये आश्रयाला पोहोचल्या, तिथेच त्यांना गौरी सावंत हे नाव पडलं. मग हळूहळू गौरीने स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आणि नंतर एक मुलगीही दत्तक घेतली.
गौरी सावंतने दत्तक घेतलेली मुलगी आज 24 वर्षांची आहे आणि तिचं नाव गायत्री आहे.
'ताली' या वेबसिरीजबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सुष्मिता सेन यात गौरी सावंतची दमदार भूमिका साकारणार आहे. ही सिरीज 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. जी तुम्ही जिओ सिनेमावर मोफत पाहू शकता.