Unhealthy Country : 'हे' आहेत जगातील सर्वात 'Unhealthy' देश; आजारपण आणि मृत्यू तर यांच्या जगण्याचा भाग
जगात विविध प्रकारचे देश आहेत. काही चांगले तर काही वाईट. असे काही देश आहेत, हे असे देश आहेत जिथे लोक जास्त आजारी पडतात. अशाच 5 देशांबद्दल माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया देशांसाठी 'Unhealthy' हा शब्द वापरण्यामागे एक कारण आहे. उच्च प्रदूषण, बिकट आरोग्य व्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव, बालमृत्यू दर, गरोदर महिलांचा मृत्यू, अकाली मृत्यू इत्यादींच्या आधारे हे देश इतर देशांच्या तुलनेत फराच मागे आहेत. तसेच Unhealthy आहेत.
Yahoo Finance वेबसाइटने घेतलेल्या अहवालानुसार, यामध्ये कोणताही देश अस्वास्थ्यकर श्रेणीत कसा येतो हे सांगण्यात आले आहे. कारण तेथील लोकांचे मानसिक आरोग्य चांगले नाही. लठ्ठपणा जास्त आहे. लोक धूम्रपान, मद्यपान जास्त करतात. लोकांच्या आरोग्यावर सरकार खर्च करत नाही, त्यामुळे येथील लोक कमी वयात मृत्यूला बळी पडतात.
या यादीत स्लोव्हाकिया पाचव्या क्रमांकावर आहे. उच्च रक्तदाब, उच्च रक्तातील साखरेचे अनेक रुग्ण येथे आढळतात. यासोबतच मोठ्या प्रमाणात लोक धूम्रपान करतात. स्लोव्हाकियामध्ये 2017 पासून मृत्यूची ही सर्वात मोठी कारणे आहेत. 15 वर्षांवरील लोक येथे धूम्रपान करण्यास सुरवात करतात. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 30 टक्के लोक धूम्रपान करतात आणि त्यांची आरोग्य व्यवस्था बिकट आहे.
हंगेरी हा चौथा देश आहे जिथे 26.4% लोकसंख्येचे वजन जास्त आहे. 2017 च्या आकडेवारीनुसार, येथील एकूण मृत्यूंपैकी सुमारे 16% मृत्यू लठ्ठपणामुळे होतात. येथे दुसरा सर्वात मोठा आजार म्हणजे रक्तदाब, ज्यामुळे मृत्यू होतो.
स्लोव्हाकियाप्रमाणे, लिथुआनियाचे रहिवासी त्यांच्या खाणे, पिणे आणि धूम्रपान करण्याच्या सवयींमुळे अस्वस्थ आहेत. येथील 26.3% रहिवाशांचे वजन जास्त आहे. येथे मुले 15 वर्षांची झाल्यावर मद्यपान करण्यास सुरवात करतात. सरासरी, प्रत्येक व्यक्ती एका वर्षात 15 लिटर दारू पितात. तंबाखूजन्य पदार्थ जास्त वापरल्याने येथील लोकांचा मृत्यू होतो.
इंडोनेशियातील आरोग्यसेवा योग्य नाही. तर त्यामुळे अनेकवेळा येथे लोक आजारी पडतात. येथील नागरिकांना गरजेनुसार उपचार मिळत नाहीत त्या अभावी अनेक वेळा त्यांचा मृत्यू होतो. सर्वाधिक धुम्रपान करणाऱ्यांमध्ये इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे.
नायजेरिया हा जगातील सर्वात अस्वास्थ्य देशांपैकी एक आहे. नायजेरियात माता मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. या देशात बालमृत्यूचे प्रमाणही खूप जास्त आहे. 2015-2017 दरम्यान, 9.1 टक्के मुलांचा 5 वर्षांचा होण्यापूर्वीच मृत्यू झाला. नायजर अजूनही पाच प्राणघातक आजारांशी झुंज देत आहे. मलेरिया, श्वसनाचे आजार, लहान मुलांचे आजार, मेंदूज्वर आणि क्षयरोगामुळे येथे सर्वाधिक मृत्यू झाले.