PHOTO: औरंगाबादेतील जंगलातांडा गाव हादरलं, बारा वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू
मोसीन शेख
Updated at:
12 Nov 2022 10:58 AM (IST)
1
अडीच हजार लोकसंख्या असलेल्या जंगलातांडा या गावात पाच सहा दिवसांपासून तापेचे रुग्ण आढळून येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
विशेष म्हणजे रुग्णांमध्ये पंधरा वर्षांच्या आतील मुलांची संख्या अधिक आहे.
3
तर डेंग्यूमुळे गावातील एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
4
प्रणव प्रेमसिंग चव्हाण असे डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
5
त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
6
तर गावातील आणखी सहा रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
7
गावात आरोग्य पथक ठाण मांडून असून, गावात साफसफाई करण्यात येत आहे.
8
गावात ठिकठिकाणी नालीचे पाणी साचून निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळेच जंगलातांडा गावात डेंग्यूची साथ पसरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केली.