Elon Musk Statue Photo : जगातील श्रीमंत व्यक्ती मस्कला चाहत्यांकडून खास भेट, पाच कोटी खर्च करत बांधला पुतळा
टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या चाहत्यांनी चक्क एलॉन मस्क यांचा पुतळा उभारला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमस्क यांच्या चाहत्यांनी त्यांच्या सन्मानार्थ 30 फूट लांब पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याची उंची 5 फूट 9 इंच आहे आणि रॉकेटवर बसलेल्या बकरीच्या शरीरावर मस्क यांचा हुबेहुब चेहरा तयार करुन लावण्यात आला आहे.
हा पुतळा बनवण्यासाठी 4.8 कोटी रुपये खर्चं आला आहे. या पुतळ्याला या चाहत्यांनी Elon GOAT Token असं नाव दिलं आहे.
मूर्तिकार केविन आणि मिशेल स्टोन यांनी सांगितलं की, एलॉन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे. त्यामुळे ते GOAT- ग्रेट ऑफ ऑल टाइम आहेत. यामुळे आम्ही त्यांच्या सन्मानार्थ मस्क यांचा पुतळा बनवला आहे.
मस्क यांचा हा ॲल्युमिनीअमचा पुतळा उभारला आहे. मीडिया रिपोर्टनुसार EGT या पुतळ्याचा ट्रेलरवरून अमेरिकेत दौरा करण्यात आला आहे.
एलॉन मस्क यांचा हा पुतळा कॅनडामधील धाती मूर्तिकार केविन आणि मिशेल स्टोन यांनी मस्क यांचा हा ॲल्युमिनीअमचा पुतळा बनवला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार EGT या पुतळ्याचा ट्रेलरवरून अमेरिकेत दौरा करण्यात आला आहे.
EGT पुतळा मस्क यांना भेट म्हणू देण्याची या चाहत्यांची योजना आहे. केविन आणि मिशेल स्टोन 26 नोव्हेंबर रोजी हा पुतळा टेस्लाच्या टेक्सास येथील मुख्यालयात नेऊन त्यांना भेट म्हणून देणार आहेत.