Quick Weight Loss: ग्रीन टीमध्ये या गोष्टी मिसळून प्या, वजन झपाट्याने कमी होऊ लागेल!
ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ग्रीन टी प्यायल्याने सर्व प्रकारची चरबी कमी होण्यास मदत होते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण देखील कमी आहे आणि ते चयापचय वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर तुम्ही ग्रीन टीमध्ये इतर काही गोष्टी मिसळून प्या. घरात असलेल्या या गोष्टी मिसळून प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रीन टीमध्ये लिंबू मिसळून प्यायल्याने खूप फायदा होतो. लिंबू वजन कमी करण्यास मदत करते.
यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात ज्यामुळे आरोग्यासाठी फायदा होतो. लिंबू घालून ग्रीन टी बनवल्यानंतर लिंबू गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवा.
वजन कमी करण्यासाठी मध अनेक प्रकारे प्रभावी आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अनेक मिनरल्स असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.
ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते. मध रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचेही काम करते. गोड असल्यामुळे मधासोबत ग्रीन टी प्यायल्याने मिठाईची लालसाही शांत होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
हळद आणि दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
ग्रीन टीमध्ये हळद आणि दालचिनी मिसळून प्यायल्याने कॅलरी जलद बर्न होतात.
ग्रीन टी बनवताना त्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा दालचिनी मिक्स केल्यास फायदा होईल. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही हे गुणकारी आहे.
पुदिना ग्रीन टीमध्ये मिसळून प्यायल्याने अनेक फायदे होतात.
पुदिन्याची पाने बारीक करून ते ग्रीन टीमध्ये मिसळून प्यायल्याने वजन कमी होतेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
ग्रीन टीमध्ये मध, पुदिना आणि दालचिनी यांसारख्या गोष्टी मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)