Currency News: नोटेवर डाग असो वा फाटलेली; नोटा चालणार की नाही? काय सांगतो रिझर्व्ह बँकेचा नियम?

Currency News: नोटेवर काही लिहिलेलं असेल किंवा नोटेला रंग लागलेला असेल, तर दुकानदार ती नोट घेत नाही. पण खरंच तो असं करु शकतो का? अशा नोटा व्यवहारात चालत नाहीत का?

Currency News

1/8
Currency News: भारतीय चलन असलेल्या नोटांबाबत आपल्या मनात असंख्य प्रश्न असतात. खासकरुन जेव्हापासून नोटबंदी झालीये, तेव्हापासून आपण नोटांबाबत अधिक जागरुक असतो. एखाद्याकडून नोट घेताना ती खरी आहे की नाही हे आपण तपासतोच.
2/8
अनेकदा एखादी नोट ज्यावर काहीतरी लिहिलंय किंवा रंग लागलेली असेल, तर दुकानदार ती हमखास नाकारतोच. पण तुम्हाला जुन्या नोटा, नोटांवर लागलेले डाग आणि नोटांवर लागलेले रंग यासंदर्भातील रिझर्व्ह बँकेचा (RBI) नियम काय आहे माहितीये का?
3/8
देशात चलन जारी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर आहे. कायद्याच्या कलम 22 नुसार, रिझर्व्ह बँकेला भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. कलम 25 सांगतं की, नोटांची रचना, फॉर्म आणि सामग्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारशींचा विचार केल्यानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेच्या अधीन असेल.
4/8
रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे की, महात्मा गांधींच्या प्रतिमा असलेल्या सर्व नोटा, ज्यावर काहीतरी लिहिलंय किंवा रंग लागलेला आहे, त्या वैधरित्या चलनात वापरता येतील. पण त्या नोटांवर असलेले अंक वाचता येणं गरजेचं आहे. अशा नोटा कोणत्याही बँकेच्या कुठल्याही शाखेत जमा केल्या जाऊ शकतात किंवा बदलून घेता येतात.
5/8
रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियमांनुसार, नोटेवर राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचा संदेश देण्याच्या उद्देशानं लिहिलेले अनावश्यक शब्द किंवा चित्रं दिसली, तर अशी नोट बदलता येणार नाही. याशिवाय, कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या हितसंबंधांची पूर्तता करण्यात मदत झाल्यास, बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (नोट रिफंड) नियम, 2009 नुसार नोटांच्या संदर्भात असा दावा रद्द करेल.
6/8
तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन फाटलेल्या नोटा बदलू शकता. फाटलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक वेळोवेळी परिपत्रकं जारी करत असतं. अशा नोटा तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात सहजपणे बदलून घेऊ शकता.
7/8
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकते. तसेच, या नोटांचं एकूण मूल्य पाच हजार रुपयांपेक्षा जास्त नसावं. दरम्यान, पूर्णपणे जळालेल्या किंवा फाटलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत.
8/8
जळलेल्या, फाटलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात. नोटा बदलण्यासाठी बँकेत कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. तुम्ही त्या सहज बदलू शकता.
Sponsored Links by Taboola