In Pics : हिवाळी अधिवेशन : विरोधकांचे विधानभवन परिसरात फुगडी अन् भजन
विधान भवन परिसरात एंट्री करताच विरोधी पक्षातील आमदारांनी टाळांच्या गजरात 'फुगडी' आंदोलन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'फुगडी' आंदोलनानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी 'भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या'च्या घोषणा दिल्या.
दिडशे कोटींची गायरान जमिन लुटणारे...मंत्री अब्दुल सत्तार राजीनामा द्या...असे पोस्टर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील आमदारांनी झळकवले.
भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या... असे भजन करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटातील आमदार टाळ वाजवून आंदोलन करत होते.
आज, विधान भवन परिसरातील मुख्य प्रवेशद्वारापासूनच आमदारांनी टाळांच्या गजरात विधान भवनाच्या पायऱ्यांपर्यंत भजन म्हणत अनोखे आंदोलन केले.
विरोधी पक्षातील आमदार विधान भवनात एंट्री करताच या टाळ आंदोलनात सहभागी होत होते.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर भजन म्हणून विरोधकांची सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सत्ताधारी पक्षातील आमदार डॉ. हेडगेवार स्मृति मंदिर रेशिमबाग येथे गेल्याने आज सर्व माध्यमांनी सुरुवातपासून शेवटपर्यंत भजन आंदोलन कव्हर केले.
विरोधकांच्या घोषणांनी विधान भवन परिसर दणाणून निघाला.
खोक्याने लुटा कधी खोऱ्याने लुटा...च्या घोषणाही यावेळी आमदारांनी दिल्या.