Raw Milk benefits : दुधाचा वापर सुंदर दिसण्यासाठीही? दररोज या टिप्स फॉलो करा!
स्वयंपाकघरात सहज दूध उपलब्ध होते . दूध आरोग्यासाठी सुपरफूड तर आहेच, पण ते त्वचेला अनेक फायदेही देते. चेहऱ्यावर दूध लावून तुम्ही सुंदर होऊ शकता. [Photo Credit : Pixabay.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकच्चे दूध म्हणजेच न उकळलेले दूध चेहऱ्यासाठी चांगले असते. यासाठी तुम्हाला एका वाटीत २ चमचे कच्चे दूध घ्यावे लागेल. कापसाच्या साहाय्याने संपूर्ण चेहरा , मान , हात आणि पाय यांना हलकेच लावा. [Photo Credit : Pixabay.com]
दूध चेहऱ्यावर राहू द्या आणि ते कोरडे झाल्यावर चेहरा पाण्याने धुवा. जर तुम्ही साबण किंवा फेस वॉश वापरत नसाल तर दुधात थोडी हळद मिसळूनही लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर आणखी चमक येईल. [Photo Credit : Pixabay.com]
रोज कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्याची समस्या दूर होते . कच्चे दूध लावल्याने सुरकुत्या कमी होतात . यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते . [Photo Credit : Pixabay.com]
हिवाळ्यात हात , पाय आणि चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने त्वचा खूप मऊ राहते . कच्च्या दुधामुळे तुमच्या त्वचेचा रंग समतोल होतो आणि सनबर्न कमी होण्यास मदत होते . [Photo Credit : Pexel.com]
दूध नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट करते . हे लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते . [Photo Credit : Pexel.com]
चेहऱ्यावर झटपट चमक आणायची असेल किंवा तुमची त्वचा स्वच्छ करायची असेल , तेव्हा कच्चे दूध चेहऱ्यावर ५ मिनिटे लावा . [Photo Credit : Pixabay.com]
सनबर्नमध्येही कच्चे दूध फायदेशीर आहे . यामुळे टॅनिंग कमी होते आणि खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती होते . [Photo Credit : Pixabay.com]
दूध लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होते . यामुळे गाल आणि त्वचा साफ होते. ज्यांना मुरुमांची समस्या आहे त्यांनी कच्चे दूध अवश्य वापरावे. [Photo Credit : Pixabay.com]
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pixabay.com]