Rice Benefits : रोज भात खाता? तर भाताबद्दल हे जाणून घ्या!
भात हे भारतीय पदार्थांमध्ये समाविष्ट असलेले प्रमुख अन्न आहे. भात हे हलके अन्न आहे असे काही लोक मानतात . तर काही लोक म्हणतात त्यामुळे वजन वाढते म्हणतात . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक खाद्यपदार्थाचे काही फायदे आणि काही तोटे असतात . भाताच्या बाबतीतही तेच आहे . [Photo Credit : Pexel.com]
तुम्हाला भात खाण्याचे फायदे माहित आहेत का ? अनेक पोषणतज्ञ भात खाण्याचा आग्रह धरतात . आहारात भाताचा समावेश का करावा याचे काही फायदे जाणून घेणार आहोत . [Photo Credit : Pexel.com]
भात खाण्याचे काय फायदे आहेत? भात हे तयार करण्यास सोपे आणि हलके जेवण आहे. हे खाल्ल्यानंतर झोप लवकर येते .[Photo Credit : Pexel.com]
तांदूळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे . यामुळे त्वचेचे छिद्र दूर होतात. तसेच केस वाढण्यास मदत होते . [Photo Credit : Pexel.com]
भात हे सहज पचणारे अन्न आहे. डायरिया आणि अपचनाची समस्या असल्यास भात खाल्ल्याने पोटाला खूप आराम मिळतो . जुलाब झाल्यास भात गाईच्या दुधासोबत किंवा दह्यासोबत खावा. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळतील . [Photo Credit : Pexel.com]
भात हे प्रीबायोटिक आहे . हे केवळ तुमचे पोट भरत नाही , तर तुमच्या आत असलेल्या सूक्ष्मजंतूंच्या परिसंस्थेची देखील काळजी घेते . [Photo Credit : Pexel.com]
शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन बी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी भात उपयुक्त आहे . साध्या भातापासून ते खीरपर्यंत भातापासून विविध पदार्थ बनवता येतात . [Photo Credit : Pexel.com]
कढी , दही, कडधान्ये, शेंगा, तूप आणि मांसासोबत भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची प्रतिक्रिया स्थिर होते, म्हणजेच मधुमेहाचे रुग्ण या गोष्टींसोबत खाऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]