कोरफडने त्वचा आणि केस बनवा निरोगी; घरीच करा अॅलोवेरा जेल
उन्हाळ्यात केस आणि त्वचेची समस्या सर्वात सामान्य आहे. घाम येणे, केस गळणे अथवा फुटणे सामान्य आहे. मात्र, केसांचा हा त्रास आपली समस्या वाढवू शकतो. या हंगामात त्वचेवरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत आपली त्वचा तेलकट असेल तर आपणास अधिक समस्या उद्भवू शकतात. अशा लोकांच्या त्वचेवर मुरुम, पुरळ येण्याची शक्यता शकते. या समस्यांपासून तुम्ही सहज मुक्त होऊ शकता. आपण कोरफड जेल लावून या सर्व समस्या दूर करू शकता. आपल्याला मार्केटमध्ये बर्याच कंपन्यांचे कोरफड जेल दिसेल. पण, आपल्या घरात किंवा जवळपास कोरफड वनस्पती असल्यास, आपण सहजपणे घरातही कोरफड जेल बनवू शकता. अॅलोवेरा जेलचे फायदे आणि ते कसे बनवायचे ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेहर्यावरील डाग दूर होतात : जर तुमच्या चेहर्यावर कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर ते काढून टाकण्यासाठी तुम्ही अॅलोवेरा जेल वापरू शकता. पिंपल्सचे डाग, त्वचा टोन समस्या किंवा रंगद्रव्य समस्यांमधे देखील कोरफड जेल खूप उपयुक्त आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी कोरफड जेल लावल्याने सर्व प्रकारचे डाग दूर होतात आणि आपली त्वचा चमकदार बनते.
क्लींजिंग आणि मेकअप रीमूव्हर : मार्केटमध्ये बरेच प्रकारचे क्लीन्झर आणि मेकअप रिमूव्हर्स आहेत. परंतु, या सर्व उत्पादनांच्या फायद्यांबरोबरच त्याचे तोटे देखील आहेत. आपण ती बराच काळ वापरल्यास आपली त्वचा खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत कोरफड जेल नैसर्गिकरित्या आपली त्वचा स्वच्छ करते. मेकअप काढून टाकते.
केसांना मॉइश्चराइज करते : बदलत्या हंगामात केस कोरडे पडणे ही एक मोठी समस्या बनते. हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा असो, त्याचा केसांवर त्वरीत परिणाम होतो. विशेषत: पावसाळ्यात डोक्याला खाज सुटणे, कोणत्याही प्रकारची संसर्ग किंवा डोक्यात कोंडा होणे सामान्य आहे. अशा समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या केसांमध्ये कोरफड जेलचा वापर केला पाहिजे. अॅलोवेरा जेल या समस्या दूर करेल आणि ते आपल्या केसांना नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ करते. केस गळणे आणि चेहऱ्यावर मुरुम येण्यापासून तुमची सुटका होईल.
पुरळ आणि मुरुमांपासून सुटका : जर आपण चेहऱ्यावर मुरुम येत असल्याने त्रासलेले आहात तर कोरफड जेल यासाठी रामबाण उपाय आहे. कोरफमध्ये भरपूर सॅलिसिलिक अॅसिड असते जे मुरुम काढून टाकण्यास मदत करते. मुरुम सामान्यतः तेलकट त्वचेवर उद्भवतात. अशा परिस्थितीत कोरफड जेल त्वचेवर एक्सफोलिएटर म्हणून कार्य करते जे पुरळ आणि मुरुम कमी करते.
केस लांब असतात - केसांच्या वाढीसाठी देखील कोरफड जेलचा वापर केला जातो. बरेच लोक ज्यांचे आईब्रो विरळ असतात त्यांनी भुवया दाट करण्यासाठी जेल लावा. जर कोरफड जेल एरंडेल तेलात मिसळून लावले तर त्याचा आपल्याला खूप जलद फायदा होईल. हे नैसर्गिकरित्या आपल्या भुवया दाट करते.
सुरकुत्या कमी करते : कोरफड जेलमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहे. अॅलोवेरा जेल दररोज लावण्याने आपल्या चेहर्यावर वय दिसून येत नाही. कोरफडात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्याचे काम करते. म्हणजेच, जर तुम्ही दररोज कोरफड जेल लावली तर तुमची त्वचा तरुण आणि सुंदर होईल.
आपण घरी कोरफड जेल सहज बनवू शकता. सर्व प्रथम, कोरफडची जाड पाने तोडून चांगले धुवा. आता त्याच्या काठावरील काटे चाकूच्या सहाय्याने काढा. यानंतर, कोरफडची पाने मधून कट करा आणि एका पात्रामध्ये जेल बाहेर काढा. आता मिक्सर किंवा ब्लेंडरच्या सहाय्याने ते बारीक करा. या जेलला एका बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. आपण याचा वापर 1 आठवड्यासाठी करू शकता. जर तुम्हाला हे जास्त दिवसांसाठी ठेवायचं असेल तर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. त्वचेच्या समस्येसाठी, आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे लावू शकता. याशिवाय केसांशी संबंधित समस्येसाठी आपण थेट किंवा नारळ तेलात घालून हे लावू शकता.