Lip Care Tips : उष्णतेचाही ओठांवर परिणाम, गुलाबी आणि मुलायम ओठांसाठी 'हे' नैसर्गिक उपाय करा!
सुंदर, गुलाबी आणि नरम ओठ कोणाला नको असतात, परंतु सगळ्यांचेच ओठ असे असतील असं नाही. बदलत्या वातावरणाचा शरीराच्या अवयवांवर, त्वचेवर परिणाम होतो, तसाच ओठांवरही होतो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्यातही जर तुमचे ओठ कोरडे पडत असतील आणि ओठांचं सौंदर्य कमी होत असेल तर असे काही उपाय आहेत, जे तुम्ही आपल्या ब्युटी रुटीनमध्ये सामील केले तर तुमचे ओठ हे गुलाबी आणि मुलायम राहू शकतात.
उन्हाळ्यात ड्राय लिप्सची समस्या उद्भवू शकते. कधी कधी तर ओठांना भेगा देखील पडतात. यासाठी हळद आणि दुधाची पेस्ट करुन ती ओठांवर लावल्यास फरक दिसू शकतो. हळद आणि दूध दोघांमध्ये असे गुण आहेत जे त्वचेला मॉईश्चर देतं आणि रंग उजळण्यास मदत करतात.
गुलाबी आणि नरम ओठ हवे असतील तर लिंबू आणि मध देखील ओठांवर लावू शकता.दोन्ही गोष्टी एकत्र करुन ओठांवर लावा आणि काही वेळाने ओल्या कपड्याने ओठ स्वच्छ पुसून घ्या.
फाटलेल्या ओठांसाठी खोबरेल तेल देखील खूप फायदेशीर ठरु शकते. खोबरेल तेलाच्या काही थेंबांनी ओठांना मसाज करा. शक्य असल्यास रात्रीही ओठांवर खोबरेल तेल लावून झोपा. यामुळे ओठ नरम आणि मऊ होतील.
अॅलोवेरा जेलनेही ओठांचं सौंदर्य वाढू शकतं. कोरफड असमान टोन कमी करण्यास मदत करते. अशावेळी कोरफड जेलमध्ये चिमूटभर दालचिनी मिसळा आणि ही पेस्ट ओठांवर लावा आणि तशीच राहू द्या. यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि मुलायम होतील.
तुम्ही ओठांवर शिया बटर देखील लावू शकता. यामुळे ओठांना आर्द्रता मिळते. त्याच्या नियमित वापराने ओठांची त्वचा निरोगी होण्यास मदत होते.
गुलाबी आणि मुलायम ओठांसाठी डाळिंबाचा मास्क लावा. डाळिंबाचे दाणे काढा आणि ठेचून सायीसह पेस्ट तयार करा आणि ओठांवर लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. थोड्या वेळाने कोमट पाण्याने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या ओठांचे सौंदर्यही वाढू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत.