Apple Tea Recipe : 'ॲपल टी' एकदा पिऊन तर पाहा... ग्रीन टीला उत्तम पर्याय; झटपट होईल तयार
ॲपल टी खूप सोप्या पद्धतीने बनवली जाते. किसलेले सफरचंद, लिंबाचा रस यापासून ॲपल टी तयार केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appॲपल टी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ॲपल टीमुळे चयापचय क्रिया सुधारते.
कुकीज आणि केकसोबत तुम्ही ॲपल टीचा आनंद घेऊ शकता.
ॲपल टी तयार करण्यासाठी सर्वात एका पातेल्यात आधी चार कप पाणी घ्या. हे पाणी गरम करा.
पाणी उकळल्यावर त्यामध्ये किसलेले सफरचंद, लिंबू आणि चवीनुसार साकर मिसळा. यामध्ये तुम्ही साखरेऐवजी मध देखील वापरू शकता.
यानंतर हा चहा तीन मिनिटे उकळवा आणि यामध्ये दोन ग्रीन टी बॅग टाका.
ग्रीन टी बॅग पाच मिनिटे राहू द्या. त्यानंतर हा चहा गाळून गरमागरम सर्व्ह करा.
तयार आहे सरळ आणि सोपी ॲपल टी. तुम्ही स्नॅक्स सोबतही ॲपल टी सर्व्ह करु शकता.
चहा किंवा ग्रीन टी पिऊन कंटाळा आला असेल तर, हा पर्याय एकदा नक्की ट्राय करा.