Success Story : करमाळ्याच्या उच्चशिक्षीत तरुणाची यशस्वी शेती, लाल केळीतून लाखोंचा नफा
एका सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण (Civil Engineer) घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिजीत पाटील हे करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावचे शेतकरी आहेत. त्यांनी चार एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली आहे.
चार एकर शेतीतून त्यांनी आत्तापर्यंत 35 लाखांचं उत्पन्न घेतलं आहे. हे उत्पन्न त्यांनी 13 महिन्यात घेतल्याची माहिती एबीपी माझाला दिली.
अभिजीत पाटील असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालक्यातील वाशिंबे या गावात त्यांनी लाल केळीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे.
अभिजीत पाटील यांनी डिसेंबर 2020 मध्ये चार एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली होती. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये त्यांनी माल काढायला सुरुवात केली होती.
टप्प्या टप्प्यानं त्यांनी या लाल केळीची विक्री केली. अभिजीत पाटील यांनी लाल केळीची पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये विक्री केली. यातून चांगला नफा झाल्याची माहिती पाटील यांनी दिली.
लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. सध्या एक किलोला 55 ते 60 रुपयांचा दर मिळत आहे.
गेल्या सात ते आठ वर्षापासून अभिजीत पाटील हे शेती करत आहेत. पुण्यातील डी वाय पाटील महाविद्यालतून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता 2015 पासून शेती करण्याचा निर्णय घेतला
चार एकर क्षेत्रावर 60 टन माल निघाला होता. यातून त्यांना खर्च जाऊन 35 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली.