हिवाळ्यात त्रिफळा खाण्याचे पाच फायदे, जाणून घ्या सविस्तर
पण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्दी - खोकल्यासाठी उपुयक्त हिवाळ्यात सर्दी आणि खोकला ही एक सामान्य समस्या आहे जी आपल्याला सतत त्रास देत असते.
त्रिफळा ही अशीच एक औषधी वनस्पती आहे. यामुळे सर्दी-खोकल्यामुळे घसा खवखवणे, नाक बंद होणे, डोकेदुखी आणि ताप यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
पचनसंस्था - पचनशक्ती वाढवण्यासाठी त्रिफळा अतिशय प्रभावी उपाय आहे. यामध्ये असलेले गुणधर्म पोटाच्या समस्या दूर करतात आणि पचनक्रिया मजबूत करतात.
केस आणि त्वचेसाठी उपयुक्त : त्रिफळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. हे त्वचेचा रंग आणि टोन सुधारते.
रोगप्रतिकारक शक्ती : त्रिफळामध्ये असे अनेक अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात.
वजन कमी करणे : त्रिफळामध्ये असलेले काही घटक चरबी कमी करण्याची शरीराची क्षमता वाढवतात, तसेच भूक कमी करून वजन वाढण्यास प्रतिबंध करते.