Bobby Deol: 'अॅनिमल'मुळे चर्चेत असणाऱ्या बॉबी देओलचे 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज घरबसल्या ओटीटीवर पाहा
Bobby Deol: बॉबी देओलचे काही चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.
Continues below advertisement
Bobby Deol
Continues below advertisement
1/8
अॅनिमल या चित्रपटामुळे सध्या बॉबी देओल हा चर्चेत आहे. या चित्रपटामधील बॉबी देओलच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत.
2/8
अॅनिमल या चित्रपटामध्ये बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्याचे काही अॅक्शन सीन्स देखील आहेत. अशातच आता बॉबी देओलचे काही चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.
3/8
बॉबी देओलने 2020 मध्ये 'क्लास ऑफ 83' या वेब सीरीजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने विजय सिंह ही भूमिका साकारली. ही वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
4/8
बॉबी देओलने 'आश्रम' या वेबसिरीजमध्ये जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. MX Player वर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता.
5/8
झी 5 वर प्रदर्शित झालेल्या लव्ह हॉस्टल या चित्रपटातील बॉबी देओलच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.या चित्रपटात विक्रांत मॅसी आणि सान्या मल्होत्रा यांनी देखील काम केलं आहे.
Continues below advertisement
6/8
प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही अपने हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटात बॉबी देओलसोबतच धर्मेंद्र, सनी देओल यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
7/8
'यमला पगला दीवाना' हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र पुन्हा एकदा एकत्र दिसले. हा चित्रपट तुम्ही झी-5 या अॅपवर पाहू शकता.
8/8
बॉबी देओलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
Published at : 04 Dec 2023 09:37 PM (IST)