थंड की गरम, केस धुण्यासाठी कोणतं पाणी चांगलं?
थंडीच्या दिवसात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड आणि कोरड्या हवेमुळे केस रुक्ष होतात. अशा हवामानात केसांवर नैसर्गिक तेलाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळा येताच आपण उबदार कपडे आणि ब्लँकेट बाहेर काढतो. आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करतात. या दिवसांत थंडीपासून वाचण्यासाठी गरम पाण्याने केस धुतले जातात. पण हे केसांसाठी हानिकारक होऊ असू शकते.
अति गरम पाण्याने केस धुतल्यामुळे नैसर्गिक सौंदर्य हळू हळू कमी होते. केस अधिक कोरडे होतात. गरम पाण्याने केस धुतल्याने कमकुवत, ठिसूळ आणि अधिक कोरडे होतात. त्यामुळे गरम पाण्याने केस धुणं टाळायला हवं.
गरम पाण्याने वारंवार केस धुतल्यामुळे डोक्यात डँड्रफची समस्या होऊ शकते. त्याशिवाय सतत डोकेही खाजवू शकते. गरम पाणी हायड्रोजन बंध तुटतात. त्यामुळे केस 18 टक्के फुगतात. त्यामुळे केस तुटणे आणि कोरडे होणे सुरू होते.
हिवाळ्यात केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. अति गरम पाणी घेणं टाळावे. खोलीच्या तपमानाचे पाणी केस चांगले स्वच्छ करते आणि केसांना हानी पोहोचवत नाही. थंडीही जाणवत नाही.