लग्नाचा सीझन सुरु होताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ
सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं चढ उतार होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. दिवाळीचा सण संपताच लग्नसराई सुरु होते. दरम्यान, लग्नाचा हंगामा सुरु होताच सोन्या चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे.
सोने वायदा बाजारात 61,074 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडला. त्यानंतर त्याच्या किंमतीत आणखी वाढ झाली आहे.
बुधवारच्या तुलनेत सोन्याचा भाव 117 रुपये म्हणजचे 0.19 टक्क्यांनी वाढून 61,141 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बुधवारी सोन्याचा भाव 61031 रुपयांवर बंद झाला होता.
लग्नाचा हंगाम सुरु होताच सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
कालच्या तुलनेत चांदी 131 रुपयांनी म्हणजेच 0.18 टक्के वाढीसह 72,957 रुपये किलोवर आली आहे.
आजपासून (23 नोव्हेंबर) भारतात लग्नाचा मोसम सुरू झाला आहे. भारतात लग्नसमारंभात सोन्या-चांदीचे दागिने देण्याचे विशेष महत्त्व आहे
सोन्याचा भाव 117 रुपये म्हणजचे 0.19 टक्क्यांनी वाढून 61,141 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.