Calcium Rich Fruits : ही 10 फळे आरोग्यासाठी फायदेशीर ; या फळांचे सेवन केल्यास आयुष्यही वाढेल
कॅल्शियम (Calcium) हा एक असा खनिजा आहे ज्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत होते. स्नायूंच्या कार्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहेत. तसेच, निरोगी राहण्यासाठी दररोज सुमारे 1,000 मिलीग्राम कॅल्शियम आवश्यक आहे.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरेशा प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्याने हाडे कमकुवत होणे, स्नायू दुखणे, बोटे आणि सांधे दुखणे, हाडे लवकर फ्रॅक्चर होणे आणि दात आणि हिरड्या कमकुवत होणे इत्यादी लक्षणे आणि दुष्परिणाम जाणवू शकतात.(Photo Credit : Pixabay)
कॅल्शियमच्या कमतरतेवर मात कशी करावी? दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यांमध्ये कॅल्शियम असते. पण, जे लोक शाकाहारी आहेत त्यांना कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यात काही त्रास होऊ शकतो. सोयाबीन, पालक, ब्रोकोली यांसारख्या काही भाज्या जरी कॅल्शियमचे चांगले स्त्रोत असल्या, काही फळे आहेत कॅल्शियमयुक्त आहेत. (Photo Credit : Pixabay)
संत्री आणि जर्दाळू : संत्री हे उत्तम फळांपैकी एक आहे ज्यात कॅल्शियम भरपूर आहे. प्रति 100 ग्रॅम संत्र्यामध्ये 45 ते 50 मिलीग्राम कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. (Photo Credit : Pixabay)
याशिवाय संत्र्यामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्याचप्रमाणे, जर्दाळूमध्ये साधारणपणे 15 मिलीग्राम कॅल्शियम प्रति 100 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये असते.(Photo Credit : Pixabay)
अंजीर आणि किवी : 100 ग्रॅम वाळलेल्या अंजीराचे सेवन केल्याने तुम्हाला 160 मिलीग्राम कॅल्शियम मिळू शकते. हे हाडे आणि दात मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी आवश्यक कॅल्शियम प्रदान करते. (Photo Credit : Pixabay)
त्याचप्रमाणे, किवी हे एक स्वादिष्ट फळ आहे ज्यामध्ये कॅल्शियम आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. किवीमध्ये प्रति 100 ग्रॅम 30 मिलीग्राम कॅल्शियम असते. एक बाऊलमध्ये किवीमध्ये 60 मिलीग्राम कॅल्शियम असते.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)
हिरवे लिंबू : मोठ्या हिरव्या लिंबूमध्ये कॅल्शियम भरपूर असते. 100 ग्रॅम लिंबूमध्ये 33 मिलीग्राम कॅल्शियम असते. याशिवाय, व्हिटॅमिन सी सारख्या इतर अनेक पोषक तत्वांचा हा खजिना आहे. हे अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे रोगांशी लढण्यास, स्वच्छ आणि निरोगी त्वचा राखण्यास आणि बद्धकोष्ठता सारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)