Onion Juice: जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कांद्याचा वापर कसा करावा?
कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे अनेक आजार बरे करण्याचे काम करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांद्याच्या रसामध्ये असलेले गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करतात. कांद्याच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे आढळतात.
यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड शरीरात चरबी जमा होऊ देत नाही आणि वजन कमी करते. कांद्याच्या सेवनाने लठ्ठपणा दूर होतो.
वजन कमी करण्यासाठी आपण कांद्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकतो. वजन कमी करण्यासाठी कांद्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी कांद्याचा रस गुणकारी आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही इतर रसांप्रमाणे कांद्याचा रस देखील पिऊ शकता.
कांदा मिक्सरमध्ये बारीक करून रस तयार करा आणि त्यात मीठ आणि लिंबू मिसळून प्या. चरबी जलद बर्न होईल.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचे सूप बनवू शकता आणि त्याचा आहारात समावेश करू शकता. कांद्याचे तुकडे करा, नंतर ते पाण्याने उकळवा.
सूपमध्ये इतर काही भाज्या देखील जोडल्या जाऊ शकतात. सूप चांगले उकळून घ्यावे, पण त्यात काळे मीठ टाकून प्यावे. आपण वर लिंबाचा रस देखील घालू शकता. ही रेसिपी वजन कमी करण्यास मदत करेल.
बहुतेक लोक सलाडमध्ये कांदा वापरतात. जर तुम्ही रोज कांदा खात असाल तर तुमचे वजन कमी होते .
कच्चा कांदा खाल्ल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही रोजच्या जेवणासोबत सलाड म्हणून कांदा खाऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. ( फोटो सौजन्य:unsplash.com)