Lemon Benefits : लिंबू जीवनसत्त्वांचे पॉवरहाऊस! वाचा तुम्हाला माहित नसलेले लिंबाचे फायदे!
जेव्हा जेव्हा लिंबाचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक लोक प्रथम व्हिटॅमिन सीचा विचार करतात. कारण लिंबू व्हिटॅमिन सीचा खूप चांगला स्रोत आहे. (Photo Credit : Pexel)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण लिंबामध्ये केवळ एकचं पोषक तत्व नसते तर व्हिटॅमिन सी सोबत व्हिटॅमिन ए आणि बी, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, तांबे, क्लोरीन, थायमिन, फोलेट इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे लिंबू खाल्ल्याने शरीराला असे अनेक फायदे मिळतात ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. (Photo Credit : Pexel)
लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी हे दोन पोषक घटक खूप फायदेशीर असल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. आणि हृदयरोग आणि स्ट्रोक रोखण्यास देखील हे मदत करते. तसेच लिंबामध्ये असलेले फायबर हृदयरोगाचे काही धोकादायक घटक देखील कमी करू शकते. (Photo Credit : Pexel)
लिंबू ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी गोष्ट आहे हे बहुतेक लोकांना माहिती देखील आहे. कारण यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. हे सर्दी आणि फ्लूस कारणीभूत असलेल्या जंतूंपासून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे कार्य करते. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळल्यास सर्दी-खोकला दूर होण्यास मदत होते. (Photo Credit : Pexel)
लिंबू वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मदत करू शकते. कारण यामध्ये असणारे पेक्टिन फायबर आपल्या पोटात पसरते, ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. लिंबू सोबत कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
लिंबाची साल आणि पल्पमध्ये पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर असते. हे यकृतामध्ये पाचक एंजाइमच्या उत्पादनास प्रोत्साहित करते. यामुळे तुमच्या शरीरातील कचरा दूर होण्यास मदत होते. फायबर युक्त फळांमुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
टीप : लिंबामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि अल्फा हायड्रॉक्सिल असते. हे ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत करू शकतात. श्वासाची दुर्गंधी टाळण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठी ही लिंबू उपयुक्त ठरतात.