Paneer Side Effects: पनीर खाण्याचे फायदे तर अनेक, पण अतिसेवनामुळे समस्याही होऊ शकतात निर्माण
पनीर हा प्रोटिन्सचा चांगला स्रोत आहे. परंतु शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यास जुलाबाची त्रास उद्भवू शकतात. म्हणूनच एकाच वेळी जास्त प्रमाणात पनीर खाऊ नये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपनीरमध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. अशा परिस्थितीत, याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते.
लैक्टोज असहिष्णुता असलेल्या लोकांसाठी पनीर ही ऍलर्जी असू शकते. जरी पनीरमध्ये लॅक्टोज कमी प्रमाणात असले, तरीही सावधगिरी म्हणून पनीर कमी प्रमाणात सेवन करणे चांगले.
गरजेपेक्षा जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या पोटात सूज येऊ शकते. छातीत जळजळ आणि तीव्र पोटदुखी देखील होऊ शकते. पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो, जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर पोट फुगणे किंवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
जास्त पनीर खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आहारातून पनीर काढून टाका.
जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर पनीरचे जास्त सेवन करू नका, कारण याच्या सेवनाने तुमची समस्या आणखी वाढू शकते.
पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दूध पाश्चराइज्ड नसेल किंवा पनीर कच्चे खाल्ल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.