Benefits of washing face with hot water : हिवाळ्यात गरम पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे की तोटे? या विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या
हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी आणि खडबडीत होते. थंड आणि कमी आर्द्रतेचा त्वचेवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवता येईल. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात बहुतेक लोकांना गरम पाण्याने चेहरा धुवायला आवडते. अनेकांना गरम पाण्याने चेहरा धुण्याचीही सवय आरामदायी वाटते. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर आहे पण ते जास्त गरम नसावे. (Photo Credit : Pixabay)
योग्य तपमानाचे पाणी वापरल्यास त्याचे फायदे मिळू शकतात आणि तोटे टाळता येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात गरम पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर आहे की, हानिकारक आहे हे जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)
कोमट पाण्याने चेहऱ्याची स्वच्छता चांगली होते. जेव्हा आपण आपला चेहरा गरम पाण्याने धुतो तेव्हा पाण्याच्या उष्णतेमुळे आपल्या त्वचेची छिद्रे उघडतात. (Photo Credit : Pixabay)
या उघड्या छिद्रांद्वारे त्वचेमध्ये साचलेली घाण, तेल आणि मृत पेशी बाहेर पडण्यास मदत होते. त्याचबरोबर चेहरा स्वच्छ होतो. त्यामुळे गरम पाण्याने चेहऱ्याची साफसफाई कारणे चांगले असल्याचे सांगण्यात येते. पण, हेही लक्षात ठेवले पाहिजे की पाणी जास्त गरम नसावे. (Photo Credit : Pixabay)
जास्त जर्म पाणी वापरल्यास त्वचा जळू शकते तसेच चाऱ्याला वेदना आणि लालसरपणा यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी योग्य प्रणाम गरम असलेले पाणी वापरावे जास्त गरम पाणी वापरू नये. (Photo Credit : Pixabay)
कोमट पाण्याने चेहरा धुण्याचा फायदा म्हणजे चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे चेहरा चमकतो. वास्तविक, जेव्हा आपण कोमट पाण्याने चेहरा धुतो तेव्हा पाण्याच्या सौम्य उष्णतेमुळे चेहऱ्याच्या रक्तवाहिन्या उघडतात. (Photo Credit : Pixabay)
यामुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो आणि चेहऱ्यावर निरोगी, तेजस्वी आणि ताजा चमक येतो.अशा प्रकारे कोमट पाणी हिवाळ्यात चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. (Photo Credit : Pixabay)
हिवाळ्यात अनेक वेळा सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला दिसतो, अशा परिस्थितीत कोमट पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर ठरते. यामुळे चेहऱ्यावरील सूज आणि वेदनाही कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)