Weight Loss: आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितला संध्याकाळच्या नाश्त्याला उत्तम पर्याय; जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी उत्तम नाश्ता कोणता?
संध्याकाळचा नाश्ता करावा की नाही, याविषयी अनेकांमध्ये मतभेद असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंध्याकाळी 4 ते 6 मध्ये भूक लागण्याचं प्रमाण वाढतं; अश्या वेळी प्लॅनिंग न केल्याने समोर येईल त्या गोष्टी खाल्या जातात.
यात प्रामुख्याने वाडा पाव, सामोसा, चाट अश्या पदार्थांचा समावेश होतो. ज्याने वजन जास्त प्रमाणात वाढते.
दीर्घकाळ काहीही न खाता उपाशी राहण्यामुळे आरोग्यावर कुठलाही सकारात्मक परिणाम होत नसल्याचं वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झालं आहे.
'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात आहार तज्ञ ऋजुता दिवेकरयांनी या संध्याकाळच्या नाश्त्याला उत्तम पार्याय सुचवला आहे.
ऋजुता दिवेकर म्हणतात संध्याकाळी 4 ते 6 ही भुकेची वेळ असते यावेळी काही खाणे गरजेचे असते. अश्या वेळी तुम्ही योग्य नाश्ता खाऊ शकता ज्याने तुमचं वजन वाढणार नाही आणि रात्री जास्त भूकही लागणार नाही.
ऋजुता दिवेकर सांगतात रेग्युलर महाराष्ट्रीयन नाश्ता म्हणजेच पोहे, उपमा, इडली हे नाश्त्याचे उत्तम प्रकार आहेत.
त्याशिवाय सर्वात उत्तम पदार्थ म्हणजे गूळ, तूप आणि पोळी. हे एकत्र करून खाल्याने तुमची भूकही शांत होते, तसेच रात्री जास्त भूक लागत नाही.
ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. (सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)