Chia Seeds: जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे सेवन कसे करावे?
वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खूप फायदेशीर मानले जाते. चिया सीड्समध्ये असलेले पोषक तत्व वजन कमी करण्यास मदत करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिया सीड्स खाल्ल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
आपण काय खातो याची योग्य पद्धत जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे सेवन कसे करावे.
चिया सीड्समध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम, तांबे, लोह, जस्त आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. चिया सीड्स केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत तर ते आरोग्यास देखील फायदेशीर ठरतात.
चिया सीड्स चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. चिया सीड्समध्ये असलेले फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट फॅट बर्न करण्याचे काम करतात. या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी असते.
चिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. चिया सीड्समध्ये असलेले पोषक तत्व वजन कमी करण्यास मदत करतात. भिजवलेल्या चिया सीड्स खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते. अर्धा तास भिजवून ठेवल्यानंतर तुम्ही ते खाऊ शकता.
चिया सीड्स स्मूदी बनवूनही खाता येतात. फळांसह चिया सीड्स स्मूदी देखील चवदार लागतात. वजन कमी करण्यासाठी, चिया सीड्स भिजवून स्मूदी बनवावी. आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे.
ओट्ससोबत चिया सीड्स खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे दोन्ही कमी कॅलरी आणि जास्त फायबर असलेले पदार्थ आहेत जे वजन कमी करण्यास मदत करतात. ओट्स आणि चिया सीड्सचे मिश्रण करून नाश्ता म्हणून खाऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)