International Yoga Day 2022: ही योगासने करा आणि सकाळचा आळस घालवा
सकाळी उठण्यासाठी अनेकजण आळस करत असतात. सकाळी उठल्यानंतरही अनेकांचा आळस कायम असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही काही योगासने केल्यास सकाळचा आळस पळवून लावू शकता आणि दिवसांची सुरुवात चांगल्या उत्साहाने करू शकता.
त्रिकोणासन : हे आसन उभ्याने केले जाते. उजवीकडे आणि डाव्या बाजूने झुकून हे आसन करावे लागते. या आसनांमुळे मांसपेशी सक्रिय करता येतात, ज्यामुळे बॉडी बॅलेन्स चांगला करता येऊ शकतो.
बालासन हा एक चांगला प्रकार आहे. याला चाइल्ड पोजही म्हणतात. या आसनामुळे छाती, पाठ आणि खांदे मोकळे होतात, आळस दूर होतो. जर तुम्हाला दिवसभरच्या कामामुळे थकवा येत असेल तर तुम्ही हे आसन करू शकता. खांदा, पाठ आदी भागांची चांगली स्ट्रेचिंग होते.
वीरभद्रासन: या आसनामुळे तुमचे खांदे मजबूत होतात. त्याशिवाय बॉडी बॅलेन्सही राहतो आणि शरीर स्थिर राहते. योगासने केल्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल.