International Yoga Day: जशी व्याधी तसा योगा! जाणून घ्या योगाचे विविध प्रकार
योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. योगाचे विविध प्रकार आहे. ते आपण जाणून घेणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वांगासन : नावाप्रमाणेच या आसनाचा संपूर्ण शरीराला फायदा होतो. हे आसन करताना शरीराचा संपूर्ण भार खांद्यावर पडतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या डोक्याला भरपूर रक्त पुरवठा मिळतो.( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा)
शलभासन : शलभ म्हणजे किटक. या आसनात शरीराची आकृती एखादया किटकासारखी होत असल्याने त्यास शलभासन असे म्हटले जाते. कंबरदुखीचे सर्व आजार दूर होण्यास मदत होते. ( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा)
मत्स्यासन : या आसनाची अंतिमस्थिती ही माशासारखी असते. म्हणून याला मत्स्यासन म्हणतात. या आसनामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि मानेवरील ताण नाहीसा होतो. ( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा)
योगमुद्रा .( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा
उष्ट्रासन : उंटाच्या नावावरुन नाव असलेलं ‘उष्ट्रासन’ हे आसन प्रसिद्ध आहे. हे आसन केल्यामुळे शरीराची लवचीकता आणि ताकद वाढते. ( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा)
सर्पासन : कंबर आणि मानेच्या स्नायूंना लवचीकता देणारं आणि मजबूत करणारं हे आसन आहे. कंबरेचं दुखण्यात हे आसन लाभदायी ठरतं. ( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा)
अंजनेयासन ( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा)
बालासन ( Photo Credit - मुग्धा पुंडे योगा ट्रेनर, लोणावळा)