PHOTO : फिटनेससाठी मराठी अभिनेत्रींचा योगाभ्यास, पाहा फोटो
Feature_Photo_1
1/8
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. मराठी अभिनेत्रीही आपल्या फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसून येतात.
2/8
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मराठी अभिनेत्री सायली संजीव हिनं इन्स्टाग्रामवर योगाभ्यास करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo Credit : @sayali_sanjeev_official/Instagram)
3/8
मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा म्हणजेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही बऱ्याचदा योगाचे धडे गिरवताना दिसून येते. (Photo Credit : @sonalee18588/Instagram)
4/8
लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री प्रिया बापटचे काही योगाभ्यास करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. (Photo Credit : @priyabapat/Instagram)
5/8
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूही योगा करताना दिसून येते. बऱ्याचदा ती आपले योगाभ्यास करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)
6/8
अमृता खानविलकर बऱ्याचदा फिटनेस रुटिनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फिटनेस रुटिनमध्ये योगाभ्यासाचाही समावेश असतो. (Photo Credit : @amrutakhanvilkar/Instagram)
7/8
अभिनेत्री माधवी निमकरचा फिटनेस फंडा अनेकांसमोर आदर्श आहे. माधवी अनेकदा योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : @maadhavinemkarofficial/Instagram)
8/8
अभिनेत्री ईशा केसरकरही योगाभ्यास करताना अनेकदा दिसून येते. तिचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : @ishagramss/Instagram)
Published at : 21 Jun 2021 02:34 PM (IST)