Indian Food: भारतातील 'हे' 8 स्ट्रीट फूड तुमचा टी टाईम बनवतील झकास! तुम्ही यांचा आस्वाद घेतलाय का?
फाफडा टी टाईमसाठी चांगला ठरू शकतो. बेसन, हळद आणि जिरे घालून बनवलेला हा लोकप्रिय गुजराती नाश्ता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही तुमच्या संध्याकाळच्या स्नॅकमध्ये बॉम्बे सँडविच देखील समाविष्ट करू शकता. हा अतिशय चवदार आणि आरोग्यदायी स्नॅक आहे. मऊ पांढऱ्या ब्रेडवर काकडी, कांदा आणि टोमॅटोचा थर टाकला जातो आणि त्यावर विविध चटणी टाकल्या जातात आणि टोस्ट करून सर्व्ह केले जाते.
मुंबईत मिळणारे आणखी एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव, ज्याचा तुम्ही स्नॅक्समध्ये समावेश करू शकता. बटाट वड्याची चव जबरदस्त असते, पावसाळ्यात वडापाव खाण्याची वेगळीच मज्जा असते.
चाट खायला कोणाला आवडत नाही. हे अगदी साधे स्ट्रीट फूड आहे, ज्याची मसालेदार, तिखट, गोड चव लोकांना आवडते. दिल्लीत मिळणाऱ्या चाटची तुलनाच नाही. चाट पापडी, आलू चाट, दौलत की चाट ते भल्ला पापडी असे चाटचे अनेक प्रकार दिल्लीच्या स्ट्रीट फूड संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत.
भेळ पुरी हे मुंबईत मिळणारे अतिशय चविष्ट स्ट्रीट फूड आहे. जे कुरमुरे, कांदा, मसाले, चटणी, लिंबू पिळून बनवले जाते.
राम लाडू हे एक अतिशय क्लासिक स्ट्रीट फूड आहे जे फक्त दिल्लीतच मिळतं. हा चना डाळ आणि मूग डाळ यांच्या मिश्रणाने बनवलेला पकोडा आहे, ज्याला किसलेला मुळा आणि मसालेदार हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केलं जातं.
कोलकात्यात काठी रोल मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. मटण किंवा चिकन मॅरीनेट केल्यानंतर आणि शिजवल्यानंतर तळलेल्या चपातीवर अंडी टाकून पोळी बनवली जाते आणि त्यावर मटण किंवा चिकनचे तुकडे टाकले जातात. त्यावर विविध चटणी लावल्या जातात आणि रोल बनवून सर्व्ह केले जाते. ही देखील एक अतिशय उत्तम डिश आहे.