In Pics: त्वचा दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात करा समावेश
त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्वचा उजळवण्यासाठी अनेक उपाय करण्यात येत असतात. त्वचा दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करायला हवा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोमॅटो - निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी टोमॅटो हा एक चांगला पर्याय आहे. रोज एक टोमॅटो खाल्ल्यास शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात मिळते. ग्लोइंग स्किनसाठी टोमॅटोचा आहारात नक्कीच समावेश करा.
पालक - हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. थकवा दूर ठेवण्यास, अशक्तपणा आणि काळ्या वर्तुळ्यांची समस्या दूर करण्यास पालक मदत करते. पालकमधून शरीराला लोह आणि व्हिटॅमिन मिळते.
सुका मेवा - त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात सुका मेव्याचा समावेश केला पाहिजे. बदाम, काजू, आक्रोड खायला हवे. सुका मेव्यामधून शरीराला व्हिटॅमिन ई मिळते. त्यामुळे शरीराला फायदा होतो.
दही - त्वचेसाठी दही फायदेशीर असते. दहीमध्ये व्हिटॅमिन बी असते त्याचा शरीराला फायदा होतो.