If You Drink Expired Beer: जर तुम्ही एक्सपायर्ड झालेली बियर प्यायलात तर काय होईल?
प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार त्यापैकी एका पर्यायाची निवड करतो. दारूबाबत एक वाक्य प्रचलित आहे, दारू जितकी जुनी, तितकी तिची किंमत वाढते. पण, बिअरच्या बाबतीत मात्र असं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिअरला एक्सपायरी डेट असते. जर तुम्ही खूप जुनी किंवा कालबाह्य झालेली बिअर निवडली, तर मात्र हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
आज आम्ही तुम्हाला एक्स्पायरी डेट असलेली बिअर प्यायल्यास काय होईल ते सांगणार आहोत. कालबाह्य झालेल्या बिअरमुळे कोणत्याही व्यक्तीचं किती नुकसान होतं? याचे काय दुष्परिणाम होणार? जाणून घेऊयात सविस्तर...
विस्की किंवा वाईन्सला एक्सपायरी डेट नसते. पण, बिअरला मात्र एक्सपायरी डेट असते. दरम्यान, साधारणपणे कोणतीही बिअर, मग ती कोणत्याही ब्रँडची असली तरीसुद्धा ती 6 महिन्यांच्या आत एक्सपायर होते. त्यामुळे बिअर खरेदी करताना तिची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट तपासणं आवश्यक आहे.
जर बिअरची मुदत संपली असेल आणि ती त्या बाटलीतून लीक होत असेल तर ती अजिबात विकत घेऊ नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही खराब झालेली बिअर प्यायली असेल तर तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते. याशिवाय, तुम्ही गंभीर आजारी देखील होऊ शकता.
आता प्रश्न असा आहे की, दारू जुनी झाली की, त्याची किंमत वाढते. पण, बिअरच्या बाबतीत असं काही होत नाही. बिअर जुनी झाली की खराब होते. पण, दारू खराब होत नाही. कारण ती बनवण्याची पद्धत वेगळी आहे. तसेच, त्यात अल्कोहोलचे प्रमाण देखील खूप जास्त आहे, त्यामुळे दारू (विस्की, रम) खराब होत नाही.
जर बिअरचा विचार केला तर, त्यामध्ये फक्त 6 ते 8 टक्के अल्कोहोल असतं. तर, धान्याचा वापर बिअर तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे काही काळानंतर बिअर खराब होते.
एवढंच नाहीतर, अनेकदा ज्यावेळी बिअरची एक्सपायर्ड डेट जवळ येते, त्यावेळी दुकानदार ती बिअर तुम्हाला बक्कळ डिस्काउंट ऑफर सांगून स्वस्तात विकतात. त्यामुळे आतापासून तुम्ही जेव्हा-जेव्हा बिअर खरेदी कराल, त्यावेळी बिअरच्या बाटल्या किंवा कॅनवर एक्सपायरी डेट नक्की पाहून घ्या.
जर ती बिअर एक्सपायर्ड झालेली असेल, तर ते दुकानदार किंवा बार मालकाच्या लक्षात आणून द्यावी. तसेच, तुम्ही उत्पादन शुल्क विभागाकडे यासंदर्भात तक्रारही करू शकता.
कारण एक्सपार्ड झालेली बिअर कोणत्याही माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. कालबाह्य झालेली बिअर प्यायल्यानं अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. त्यामुळेच एक्सपायर्ड झालेली बिअर अत्यंत घातक ठरते.
(वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)